Thursday, 27 May 2021

MY CORNER


Do you have your own space / a corner which holds all your favourite belongings? 

It's that niche which separates you out from your routine, mentally and physically. Does it ring a bell...that maybe I haven't ever thought about it! I kept going with the flow. Accepting the space around me, occupied it and went on. I never believed or thought that I want that space. To sit relax, be happy about, to contemplate within chaos, to hold on to when everything else is falling apart, to snuggle away. The more I take care of it, stylize it, embrace it, the more it gives back. 

It took me 38 years to realise that I want that corner of mine. A corner which I can carve out as my own space. It's a gathering of all 'my things'. A book, a pen and enormous feelings i expressed through my poems,  the colours which gave me a liberty of adding them into my life. My plant, my O2, my small cute owl, a memory and an aroma dispenser to lift the mood up....Certainly things will get added as the time passes. But I will always keep going back to that corner. 
Have you experienced this? Unknowingly? Have you tried specifying your space?

Drop your photos here.....

Sunday, 16 May 2021

Vadapav

वडापाव
गरमा गरम वडा आणि लुसलुशीत पाव
मधेच लाल चटणी दाण्याची लाव
मिरची खा चवीला अधून मधून
दाद दे तिला किंचित ठसकून......

डोळ्यात पाणी येईल लागेल थोडा खाट
तरी संपव सगळा मज्जा आहे त्यात
आता मात्र एक कर, नको पिउस मिल्कशेक
खमंग चव तशीच जिभेवर राहू देत....

हॉटेलात नाही जमायचा हा फर्मास बेत
हातगाडीवरच मिळते स्पेशल प्लेट
दोन्ही हातात धरुन घास तोडायचा
मॅनर्सना बिनधास्त पूर्णविराम द्यायचा....

गरिबाचं जेवण अशी याची आहे टर्म
मधल्या वेळी खातात काही जस्ट फॉर फन
पण Potato and bun मधे वडा पावची मजा नाही
आणि नंतर फक्कड़ चहा शिवाय खादाडीला रजा नाही.

अमृता

Monday, 16 September 2019

आलया भोगासी. . .असावे सादर

रुग्णालय हे नावंच फारसं छान वाटत नाही. त्याहून तिथे येणारे अनुभवही काही फारसे सुखावह नसतात. त्यामुळे हि जागा अजूनच बदनाम झाली असावी. खरंतर रुग्ण आपल्या आजारपणात येऊन राहिल्यावर त्याची योग्य ती शुश्रुषा जिथे होते तेच हे आलय. काही जण तर ईथे पाऊल ठेवताच निम्मे बरे होतात. तरी या नावालाच एक प्रकारची  निगेटिव्ह झालर आहे. बरं मग मला सांगा, प्रसुतीसाठी व नंतर बाळ बाळंतिणीला ठेवतात ते  रुग्णालय नसून प्रसुतीगृह का असते? हे आणि असे अनेक प्रश्न मला पडले आहेत. मला नेहमी असे वाटते की मानसिकदृष्ट्या अशक्त (म्हणजे मला दुःखी म्हणायचंय) व्यक्तीने एकदा रुग्णालयाचा फेरफटका मारावा म्हणजे त्याला कळेल की हाती पायी धडधाकट असणारे आपण किती भाग्यवान आहोत. मूड बदलण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा किंवा माध्यमांचा उपयोग करून घेऊ शकतो. पण मूळ तब्येतीतच बिघाड झाला तर काय करायचे. त्यामुळे शक्यतो रुग्णालयाची पायरी चढणे नकोच. बहुधा नाईलाजानेच हा मार्ग धरावा लागतो. या ठिकाणी एका रुग्णामागे केवढी मोठी फौज उभी राहते. आणि या सर्वांना सामावून घेणारी जागा म्हणजे हे आलय. इथे भरती होणारा माणूस, त्याच्या जवळचा नातलग, भेटायला येणारे आप्त, सिस्टर्स आणि डॉक्टर्स . . वेगवेगळ्या स्तरांवर आणि हुद्द्यांची किती विविधता पाहायला मिळते. त्यांच्या मनात काय चालले असेल? राग आणि प्रेम या रोजच्या साचलेल्या भावनांमधून बाहेर पडून काळजी, भिती, माया, अशा भावना मन मोकळं करत असतील. ओ. पी. डी मधे बसलेल्या माणसाची काय निदान होणार याबद्दलची धाकधूक, ओ. टी च्या बाहेर आणि आत असलेल्याची भिती, अत्यंत वाईट परिस्थितीतल्या रुग्णाच्या नातेवाईकाची अगतिकता जेव्हा एकाच छपराखाली येते. . . तेव्हा ती जागा अनेक अव्यक्त किंवा व्यक्त भावनांचा खजिना होऊन जाते. पॅसेजेस मध्ये बसलेल्या नातेवाईकांचा ताण येणार्या जाणार्या प्रत्येकाला जाणवत राहतो.
यातच भर पडते ती वासांची. अौषधे, निर्जंतुके, फिनाईल यांचे ऊग्र वास त्या वातावरणातला ताण अजूनच प्रखर करतात. दुपारच्या वेळेला लिफ्टमध्ये येणारे अन्नाचे वास, भर ऊन्हातून येणार्याच्या अंगाला येणारा घामाचा दर्प प्रकर्षानी जाणवतो. जर मोठी इमारत असेल तर वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मधून येणारे संबोधक वास.
या डिपार्टमेंट्सची सुद्धा वर्गवारी असते. सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग उपचारपद्धती किंवा रुग्णाच्या अस्वास्थ्याचे परिमाण मोजून ते ठरत असावे. त्याप्रमाणे त्यांची देखभाल केली जाते. किंवा सोयी ठरवल्या जातात. I C U मधल्या पेशंटचे नातेवाईक त्यांना राखून दिलेल्या बंक बेडवर दिवसेंदिवस आपला संसार मांडतात. कान फक्त आतून आपल्याला कोणी बोलावत नाही ना याकडे लागलेले असतात. हळूहळू एकमेकांशी ओळख होऊन गप्पा वाढत जातात. आणि ती जागा प्रचंड बोलकी होते. या सगळ्यात दुसर्याच्या रोगाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता इतकी अनावर असते की त्यातूनच पुढे विषय निघतात.
गेल्या काही वर्षात मी जेव्हा जेव्हा रुग्णालयात गेले आहे.. भेटायला किंवा स्वत: रुग्ण म्हणून, तेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टिंचे मला फारच अप्रूप वाटले आहे. ही जागा म्हणजे एक मोठी संस्थाच आहे. आणि यातील प्रत्येक भागीदार केवळ काही मर्यादित काळापुरता सहभागी होणारा घटक. परवा जवळच्या नातेवाईकाची विचारपूस करण्यासाठी घेतलेल्या धावत्या भेटीमध्ये पाहिलेला हा प्रसंग मनात खूप गोंधळ घालून गेला.
प्रसंग तसा छोटाच. आणि तसं बघायला गेलं तर फार काही सनसनी खेज वगैरे नाही. तर त्या दिवशी भरदुपारी या प्रथितयश रुग्णालयाच्या गेटपाशी रिक्षाने उतरले. चालत दरवाजात पोचेपर्यंतच जाणवले की काहितरी वेगळं दिसतंय. बघते तर त्या दारात भरदुपारी पोर्चच्या मधेच चार बायका घोळका करून बसलेल्या दिसल्या. नुसत्या नाही तर त्या सर्वच्या सर्व धाय मोकलून रडत होत्या. नक्कीच कुणीतरी देवाघरी गेले असणार. पण नक्की कोणाचं कोण हे कळेना इतक्या मनापासून चौघींनीही पोर्च डोक्यावर घेतले होते. रडता रडता 'नशीब फुटलं गं', ' देवीचाच कोप झाला', 'नशीबानी घात केला' असं वारंवार अोरडून म्हणत होत्या. येणारे चमकून बघत होते. रिक्षाची वाट पाहणारे करमणूक करून घेत होते. पांढरपेशा वर्ग 'काय फालतूपणा चाललाय' या अर्थानी बघत होता. पण याचा त्या बायकांवर काहिहि परिणाम झाला नाही. त्यांना थांबवण्यासाठी पाठवलेल्या वा‌‍ॅचमनला न जुमानता त्या मुक्तपणे व्यक्त होत होत्या. जणू काही त्यांच्या हाका ऐकून तो गेलेला माणूस परत येणार होता. शेवटी त्यातल्या एकीने तिथेच लोळण घेतली. अगं अगं अगं. . . असं मी उगीचंच मनातल्या मनात म्हणाले. आणि तिथून वर निघून गेले. जाताना मनात आलेले असंख्य विचार 'या बायकांना असा तमाशा करून काय मिळतं? आजुबाजूला काय चालू आहे याची शुद्ध तरी आहे का? लोकं बघतायत . . कशी लोळतीये ही बाई? जनाची भीड न बाळगता मनात येईल ते करून टाकण्यासाठी, किंवा तसा नुसता विचार करण्यासाठी सुद्धा मी फारच पुढारलेली होते. माझ्या मनाला पटेना.  भेटून झाल्यावर जेव्हा परत खाली आले तेव्हा अजूनही त्या बायका तिथेच ठाण मांडून गप्पा मारत असलेल्या दिसल्या. वा‍ॅचमनला म्हणाले शांतता दिसतीये तर म्हणे 'मॅडम यातल्या एकाही बाईचा गेलेल्याशी काहिच डायरेक्ट संबंध नाही. ही त्यांच्याकडची पद्धतच आहे. आत्म्याला शांती मिळते म्हणे'. मी अवाकच झाले.
एकूण सगळाच प्रसंग, त्यांचं दिलखुलास आक्रंदन, अश्रुंचा बेहिशोबी वर्षाव, आपल्याकडे येणारे जाणारे पाहतायात याकडे असलेलं त्यांचं दुर्लक्षं आणि बाहेर हे सगळं चालू असताना. . . आतमध्ये विनाअडथळा नेहमीच्या पद्धतीने चालणारी ही मोठी संस्था. दोन्ही गोष्टी एकमेकांचं काहिहि वाकडं करू शकल्या नाहीत.
बघ्याची भूमिका असूनही पुन्हा एकदा मला माझ्या समाजाकडे बघण्याच्या द्दष्टिकोनाचा परत एकदा विचार करावा असे वाटले.
अमृता

Thursday, 14 July 2016

निनावी कविता

माझा कविता लिहायचा एक प्रयत्न

अधीर अधीर मनाची , सरल तरल व्यथा
बधीर बधीर झाले रे, तुज काय सांगू कथा।
घनगहिऱ्या प्रीतीचा, मज लागतसे ना थांग
तुझी बावरी झाले पुरती, काय करू मी सांग।
तुझ्यासवे असताना, जीव कस्पटापरी होई
थवा कोवळ्या स्वप्नांचा, हलकेच स्पर्शुनी जाई।
ओंजळभरल्या हातांनी, मी किती साठवू पाही
कणाकणानी तरीही कसा, रिता खजिना होई।
वेडे मन मग सांगे, तू सोडू नको हा हट्ट
कधीतरी जमेल सहज, होईल पकड घट्ट।
तेव्हा मात्र मग तू, पाऊल मागे घेऊ नकोस
नको नको म्हणून मग, वेडया मना थांबवु नकोस।
अमृता